" या जीवनप्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात. काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते. वाटते आता आपली
दिशा बदलेल. लहरी बदलतील. आपल्याला एक
वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेल असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात अन् प्रत्येक प्रवाहांना वेग वेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो निसर्गनियमित. पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीचच कोरडेपणाची जणीव होत राहते.
पण एक गोष्ट सलते ती ही की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन
त्याच्या अथांगतेत असीम काळाकरिता विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा ..!! "
... विश्व ताऱ्यांचे
