April 19, 2013

सदरा सुखी माणसाचा ..!

प्रसंग - आय. आय. टी. मद्रास
सायंकाळची वेळ.
       लॅब मधील काम आटपून मी रूम मध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रीकॅल विभागाच्या बस थांब्यावरच्या कट्ट्यावर बसलेलो होतो. इथे देश्यातल्या सर्व भागातून विध्यार्थी येत असल्याने कोणाची कोणती मातृभाषा असेल हे सांगता येत नाही.
      कडेलाच एक मुलगा बसलेला . योगायोगाने तो मराठी भाषिक निघाला . फोनवर त्याच बोलणं चालल होत .मराठी कुठे कुठेच ऐकायला मिळत असल्याने कान आपोआपच त्या दिशेकडे वळले. त्याच फोन वर बोलणं नव्हे तर रडनेच चालू होते अस म्हणणं वावग ठरणार नाही . बहुदा तो पालकांशी बोलत असावा .
      बोलण्याचा रोख असा होता की ,' इंटर्नशिप नाही मिळाली आतापर्यंत, आयुष्य वाया गेल. इतक करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही . मी फोन ठेवतो आता , मला सहानुभूती नकोय' वगैरे वगैरे .....
मला खरोखरच विस्मयजनक वाटल आणि विचारांचं वादळ हुंकारू लागलं.
    आय . आय . टी . सारख्या संस्थांमधून इंजिनिरिंग करण प्रत्येकाच स्वप्न असतं. मला इथे इंटर्नशिप मिळाली त्यावेळी खूप आनंद झाला होता . तर हा मुलगा इथून बाहेर इंटर्नशिप मिळाली नाही म्हणून अतिशय दुखी होता.त्यान फोन ठेवताच त्याला विचारले , " काय रे इतका का दुखी आहेस ?" त्यान सर्व वरील दुखी कथा सांगितली.
मी म्हंटल , "अरे इथे मी ज्या कारणासाठी आलोय आणि ज्यामुळे मी खुश झालो होतो  त्याच कारणासाठी तू इथून बाहेर जाण्यासाठी दुखी आहेस !!"   क्षणभर आम्ही दोघे ही शांत ....
थोड्याच वेळात त्या दुखी चेहऱ्यावर हसू उमटले आणि आम्ही दोघे ही हसू लागलो.
मनुष्यवृत्तीच अशी आहे की नेहमी त्याला आणखी हवे असते. इच्छा असणे जरुरी आहे किबहुना असायलाच हवी पण ती पूर्ण नाही झाली म्हणून  लगेच आयुष्य वाया ?? आमच्या दोघांच्या परिस्थितीमधून  एक सुटलेली कडी आढळून आली ती म्हणजे आपण जे आहोत त्याबद्दल समाधान न असण. हे कुठतरी थांबायला हव.
    सुखी माणसाचा सदरा मिळेल का ? अशी एक कथा आहे.अन् त्यानुसार हे अशक्य आहे. पण मला तो या सुटलेल्या कडी मध्ये दिसला ,जेंव्हा आम्ही दोघेही  काहीही स्पष्टीकरण न देता खूप हसलो. तो कुणी कसा वापरायचा हा ज्याच्या त्याच्या जीवन पद्धतीचा भाग आहे. पण तो आहे यावर विश्वास ठेवा  , त्याला ओळखण्याची आणि वापरण्याची सवय नाहीय एवढेच ..!! तर मग काय , मित्र हो कराना ही पण एक सवय ..
आपण जे आहोत त्याला समाधानाणे स्वीकार करायची..!!
                                                                                                                                         विश्व ताऱ्यांचे

April 14, 2013

मनपाखरू

मन ...
खरतर याला कसं अन् कुठ बांधून ठेवायचं.
प्रत्येक ठिकाणी  धाव घेतच ..अल्लड.. उनाड.. अगदी प्रकाशाच्या गतीलाही मागे टाकून!
या मनाचे रंग ते किती !        
 कधी हसवत इतकं.. की वाटत आपण जगात सर्वात सुखी आहोत.. तर कधी लहान मुलाप्रमाणे रडवतही, सारे जगच दुखमय भासतं! कधी अभिमान, तर कधी अपमान.
कधी आश्चर्य, तर कधी निराशा..
कधी जय, तर कधी पराजय .. 


 


स्वप्नांचा डोलारा उभा करणं हा तर मनाचा हक्काचा भाग ... इतकी स्वप्न पाहायची ... अन् पुरी नाही झाली की स्वप्नभंग अन् पूर्ण झाली की नवीन स्वप्न... कारण याला काही कक्षाच नसतात ना.. आणि एवढ्यात समाधान मानेल तर ते मन कसलं! कोणी याला अलगत जपतं, कोणी बेतालपणे, तर कोणी कठोरतेणे.
      अस म्हणतात की मनाला शिस्त लावली की आपोआप सगळ सुरळीत चालतं ..पण सगळचं सुरळीत झाल तर आयुष्य ते कसले? आणि मज्जा ती कसली..!!  पण काहींही  म्हणा, याच अस्तित्व जीवनात बहार निर्माण करते. माझ्या एका दोस्ताचा फेमस डायलॉग आहे, तो नेहमी म्हणतो "गड्याव, जीवनात रंग पाहिजे राव..!" अगदी  खर आहे .
      माझ्यासाठी मन हे एक  फुलपाखरु आहे...त्याला स्वछंद फुलापाखाराप्रमाणे उडून द्यायचे.. भावनांच्या सुमनांवर...कधी या फुलावर कधी त्या फुलावर अलगतच.. नाहू द्यायचं त्याला जीवनाच्या प्रत्येक रंगात... महत्वाचा भाग असा की हे सर्व, फुलाला कोणतीही हानी न पोहोचवता...धक्का न पोहचवता.. मध मात्र  गोळा करायचा.. तो पण किती.. जगण्यापुरताच.. वर्तमानापुरताच!  इतकं सोप नाही हे, कारण 'फुलपाखराला सुद्धा फुलपाखरू बनण्यासाठी वेगवेगळ्या अवस्थांतून जावे लागते.'
        पण ही सहजता आली की जीवनपुष्प रंगमय होऊन आलेल्या प्रत्येक वादळात टवटवीत राहील, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अन् क्षणानंतरही.. इतरांना आपल्या अस्तित्वाच्या सुगंधाने आनंदित करण्यासाठी.
                                                                                                                                                                                                                                                                                        ....विश्व ताऱ्यांचे
                                                                                                

April 11, 2013

Believe !!!


      Belief has great importance in our lives. When we keep faith on a person or a thing we should think..think twice..thrice..!! And then once you believed give yourself  with belief such that you would not get a chance to see back. Belief includes tremendous power in it.

       Believe, 'if a person in this world can do a thing, achieve something , you also can do the same.'
Many of the impossible things in first sight , has been possible on the basis of just mere a thought , 'yes we can'. The most important thing that, I can say 'missing link' is consistency in believing. Most of the time due to lack of patience in this fast running day today life we are tending toward forgetting things, values, principles and beliefs so rapidly that results in undesired outcomes, scenes which gives strength to our thoughts of impossibilities.

        It is the power or we can say first inspiring, dazzling thought which gives rise to revolutionary inventions, great relationships, freedom, great religions and many more. My intention here is to remember, we should start believing , learn to believing right things at the right time , wisely.
Believe !!!

April 9, 2013

अपेक्षा करावी ?


    चहा  पिता पिता मनन करणे खरंच मस्त वाटते ..का कुनासठाऊक शब्द निर्मिती होता होता अतिशयोक्ती ही होतेच !! त्यात मनाला पडलेले असंख्य प्रश्न ..उत्तरे मिळाली की   मन शांत होईल ही वेडी आशा ..एका दोस्ताने सांगितलेले अगदी खरंच आहे, आलेल्या परिस्थितीचा सामना करणे एवेढेच आपल्या हाती असते ..आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून ही आनंद मिळवता येईल का हा एक वेडा पण खुपच प्रभावी विचार !!!
    प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते त्याला खरंच एक कारण असते ..पण एकाच व्यक्ती विषयी वारंवार विचार येणे हे थोडे विस्मयजनक आहे . यातून अपेक्षा अन् अपेक्षाभंग अशी परावर्तने सुरु होता ..त्यामुळे अपेक्षा करतानाही एकाच व्यक्तीकडून न करता अपेक्षा जिथून निर्माण होते त्या निर्मात्या कडूनचं करावी...यामुळे होईल काय ..अपेक्षाभंगाचे खापर कमीत कमी आपण त्या व्यक्तीवर तर फोडणार नाही अन् त्या व्यक्तीबद्दल मन कलुशीत होणार नाही  . कारण इथे आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलतोय आणि मग आलेल्या परिस्थितीला त्या निर्मात्याचीच इच्छा मानून स्वीकार करायचा..आनंदाने .!!
 सांगायचा मुद्दा हाच की ...  
    अपेक्षा हे दुखाचे कारण आहे हे सार्वजनिक विधान आपण फोल ठरवू शकतो जर  आपण अपेक्षा पूर्तीचा स्त्रोतच बदलला..आणि त्या निर्मात्यावर पूर्ण विश्वास ठेऊन दिलेल्या प्रसादाचा स्वीकार केला .
     अरे , विचार करता करता चहा संपला ...कळलेही नाही.आजून एक कप चहा हवा आहे ... पैसे तर संपले ..अण्णा और एक कप टी मिलेगा क्या ??  अपेक्षा ...हा हा हा ..पण स्त्रोत बदलला ..चेहऱ्यावर एक स्माईल आली ..अण्णा च्या ही चेहऱ्यावर हसू आले .."लेलो तंबी ..पैसा कल देना.."
                                                                                                                           .... विश्व ताऱ्यांचे


"

April 8, 2013

प्रेम म्हणजेच जीवन अन् जीवन म्हणजेच प्रेम ..

प्रेम

    राधेच कृष्णावरील ,मीरेच मधुसुदनावरील ,रामाच सितेवरील ...

प्रेम 
    
    दशरथाचे रामचंद्रावरील , वासुदेवाचे कृष्णावरील ...

प्रेम 
  
     हिरकणीचे आपल्या बाळावरील , सिंधुताईंचे आपल्या मुलांवरील ,एका मायेच लेकरावरील ....

प्रेम 
      श्रावणबाळाचे माता पित्यांवरील , भक्त प्रल्हादाचे नारायनावरील...

प्रेम 
    
      द्रोणाचार्याचे  अर्जुनावरील , कर्मवीरांचे विद्यार्थ्यांवरील, सानेगुरुजीचंचे शिष्यांवरील...

प्रेम 

    शिवरायांचे जनतेवरील , बाबा आमट्यांचे कुष्ठरोग्यांवरील, मदर तेरेसांचे पिडीतांवरील ...

प्रेम 
    त्या हुतात्म्यांचे देशावरील ,कलाकाराचे कलेवरील , ज्ञानोपासाकाचे ज्ञानावरील....
        
            प्रेम म्हणजेच जीवन अन्  जीवन म्हणजेच प्रेम ..
                                                                  ...  विश्व ताऱ्यांचे 
       .

April 7, 2013

शब्दतरंग








      " लिहायच म्हणजे भरपूर लिहिता येत.  लिहिणं म्हणजे मनातले तरंग कागदावर उठवणं. याला काही कोणत्या जाती धर्माचं किंवा गोत्राचं असण आवश्यक नाही. जिवंत असण्याची गरज आहे, मग तो सुखाचा धागा असो वा दुखाचा डोंगर ..!! भावनांचा हा लपंडाव अलगतच कलमातून उतरावयाचा. एकदा हा खेळ सुरु झाला की संपता संपत नाही .. 
मग शाई संपेल असा  कंजुषीचा भाव मनात आणून कलमाला विश्रांती द्यायची !"
                                                                                                                                       विश्व ताऱ्यांचे
   

April 6, 2013

ताऱ्यांच्या विश्वात स्वागत ...मनांचे...हृदयांचे ...आणि चिरंतन अस्तित्वात असलेल्या विचारांचे ....

शुभेच्छा


  

  " आपण सारे तारे ....  एका अद्रुश्य अशा धाग्यांनी त्या निर्मात्याला जोडलेले....अन् हृदय ही जणू त्याची प्रतिमा ...आशा करतो ..ताऱ्यांच्या या विश्वात भरारी मारताना ..या धाग्याचा कुणालाही विसर न पडो..."

                                                                                                                     विश्व ताऱ्यांचे