प्रेम या शब्दाची व्यापकता आपल्या भाषेमध्ये लोप पावत चालली आहे असे मला वाटते. दोन भिन्न लिंगी युवकांमध्ये प्रेम भावना जागृत होणे अगदी सहाजिकच आहे. जग खरंच वेगळे भासू लागते वगैरे वगैरे !! त्यात वावगे असे काहीच नाही. पण ही झाली फक्त मर्यादित प्रेमाची व्याख्या. केवळ त्यांच्या वैयक्तिक पातळीवरची.पण सामाजिक पातळीवर समाजाला विशाल अशा विश्वश्नीय प्रेमाची गरज आहे जे समाजातील भ्रष्टाचार, हिंसाचार, लोभ, जातीयता, धर्मियता यांना पुरून उरेल अन् कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था भक्कम करेल.
व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीत साजरा केला जाणारा भारत हा एकमेव देश आहे. परदेशात मात्र याचा अर्थ व्यापक आहे. एक मुलगा आपल्या 70 वर्षे वयाच्या आजीलाही लाल गुलाब देऊन आपला व्हॅलेंटाईन बनवू शकतो. व्हॅलेंटाईन म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो अशी व्यक्ती. आपण डोळे बंद केल्यावरदेखील त्याचेच अस्तित्व आपल्या डोळ्यांसमोर तरंगत राहते. ज्याप्रमाणे मीरेने कोणत्याही स्वार्थाशिवाय कृष्णावर प्रेम केले त्याप्रमाणे. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाईन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. व्हॅलेंटाईनचा खरा अर्थ आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम ... आकाशाएवढे :)
Valentine's Day is being celebrated in memory of Saint Valentine who preached and practiced divine love for God! हे ही विसरून चालणार नाही.
... विश्व ताऱ्यांचे
