खरतर 'थेसिस सबमिशन' आणि 'त्या' आपल्या सर्वांनाच जाणीव असलेल्या शेवटच्या 'कार्यालयीन ओढाताणीमुळे' फार दिवसांपासून ब्लॉग वर येण्यास वेळचं नाही मिळाला, असो...
पण या सगळ्या ओढतानिमध्ये आणि स्थानांतरनामध्ये मन मात्र एका विचित्र अवस्थेतून जात होते. 'जीवन' नावाच्या गलबताच्या विविध पैलूंना हळूच स्पर्श करत होते आणि त्याची सहृदय जाणीव कधी डोळ्यांमध्ये हलक्याश्या सरी तर कधी चेहऱ्यावर हास्य उमटवत होती.
चेन्नई चे ते दिवस खरंच फारच निराळे होते. नवीन भाषा , नवीन संस्कृती, नवीन जीवनपद्धती! सुरवातीला जरी प्रतिकूल वाटत असली, आणि जरी आपण कितीही प्रश्नांना सामोरे गेलो तरी शेवटी ते ठिकाण , तो प्रदेश सोडताना जर आपण मागे ओळून पहिले तर आपल्या लक्ष्यात येते की आपण ज्यावेळी इथे आलो त्याहून अधिक काहीतरी आहोत. आपल्या अनुकूलतेच्या व्याख्येची कक्षा नकळत रुंद झालेली असते.
नवीन लोकांमध्ये राहताना आणि वावरताना त्यांची संस्कृती, त्यांच्या सवयी स्वीकार करताच आपल्याला लक्षात यते की they are the same people, as we are. मग तो चहा वाला अण्णा किंवा 'तंबी लाईट बिल, तंबी पानी बिल' म्हणून कान दुखेपर्यंत ओरडणारी घरमालकीन . आम्ही केवळ हातवारी अन् हावभाव ही नवीन भाषा शिकलो😁 आमचा जवळचाच किराणा मालाचा दुकानदार वर्षभर जरी हिशोब हिशोब करत असला तरी शेवटी भाऊक झाला. शेवटचे त्याचे संभाषण जरी अर्थ नाही सामजला तरी भाऊक करून गेले. आजारी असताना माझा spiritual friend राहुलने घेतलेली निस्वार्थ काळजी विस्मयजनक होती. या दिवसांमध्ये बरेच उच्च महत्वाकांक्षा घेऊन आलेले मित्र भेटले. प्रोफेसरांबरोबरच्या नात्याने तर बरेच रंग धारण केले...प्रोजेक्ट आणि सबमिशन या प्रकारात मोडणाऱ्या सर्वानांच याची जाणीव असते 😁😁
काही विलक्षण नाती तर फार काही शिकवून, त्याचबरोबर गुढ प्रश्न ठेऊनही गेली. काही व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि एक वेगळीच दिशा देऊन जातात. पण त्यांच्या पाउलखुणा तशाच राहतात आयुष्यभर ! यांचा आपल्या जीवनात खरच काहीतरी रोल असतो ?
या प्रवासात वेळेचे नियोजन, समयसूचकता, गुरुनिष्ठा, नात्यांचे संगोपन अन् वाचनबद्धता यांचा अपरीहार्यता दिसून आली. हा हा ...यापैकी वेळेचे नियोजन मध्ये मी थोडा अजून ही वीक आहे . Why to lie?
Thats all...
पण जाता जाता प्रश्न पडतो , Why God made us emotional beings? Because, what all I revealed is though whoever we are, from wherever we are... एक गोष्ट सेम आहे. ती म्हणजे भावना अन् त्यातून उत्पन्न होणारे आनंदी हास्य किंवा दुखद रडू.. अन् त्याच्यातही चाललेली आयुष्यभराची धडपड! विशेष म्हणजे हे अन्य प्राण्यांना ही लागू आहे ह .. कारण एक तमिळ डॉग माझा चांगला दोस्त झालाता राव 😁
विश्व ताऱ्यांचे ..