बऱ्याचदा आपल्याला मनातून एखादी गोष्ट करावीशी वाटते. त्याचवेळेस ती गोष्ट करणे "Unethical" वाटते. अशावेळी केवळ "Ethics" पाळण्यासाठी, मनात मात्र ती गोष्ट करण्याची तीव्र इच्छा बाळगून ती गोष्ट करणे टाळणे हे "Unethical" पेक्षा ही आपत्तीजनक ठरते. इथे आपणच आपल्यावर प्रलय ओढावून घेतो. आणि त्याच अदृष्य कारण ही सापडत नाही. सरते शेवटी आपल्या आयुष्यात जे परिणाम येतात ते आपण केलेल्या कृत्याचे नाहीत तर ते करताना मनामध्ये बाळगलेल्या भावनांचे !
जीवन फक्त जगण्यापेक्षा ' जीवन ' बननं आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाला आनंदाची एक झुळूक देऊन पुढील प्रवासास लागण, हसत हसत, सुखात आणि दुखात ही ..... सुयोग हावळ

No comments:
Post a Comment