स्मृतिगंध
स्मृती जशा वेदनादायक असतात तशा अल्ल्हाददायक ही असतात. आयुष्याच्या शेवटच्या पढावात पहायला गेले, तर आयुष्य म्हणजे एक स्मृतींचा संचय दिसू लागतो. वर्तमानकाळात आजच्या जगलेल्या प्रत्येक क्षणांच रूपांतरण नकळत स्मृतींमध्ये होत असते पण यावेळी देखील आपण जर भूतकाळातील घटना आणि भविष्याच्या कल्पना यांमध्ये रममान होत असू तर आपला स्मृतीसंच रटाळ भासू लागणार आणि त्याच्यातील नाविन्य कमी होऊन तोचतोचपणा निर्माण होणार. म्हणूनच आपला स्मृतीसंच सुखद, गौरवशाली आणि परिपूर्णतेने भरलेला पहायचा असेल तर वर्तमानकाळात आपल्या समोर होऊ घातलेला प्रत्येक क्षण, घटना हा वर्तमानातच राहून निर्विचारपणे जगता आला पाहिजे. प्रसंगी समोर आलेला दुखद क्षण, वेदना, किंवा क्रोधित करणारी घटना ही अलगतपणे स्विकारून तिचे सुखद अनुभवात रूपांतरन करण्याची कला ज्याला जमते, त्याचा स्मृतिसंच समृद्धशाली बनतो, आणि आयुष्याचे सार्थक झाल्याचा भाव पूर्णतेची तुष्टी देऊन जातो.
असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा
गंध संपला तरी, सुगंध दरवळत रहावा !!
... विश्व ताऱ्यांचे
आनंदी आणि सुखी क्षणांचा स्मृतिसंच जमा करता आला की आयुष्य सफल झालेच म्हणून समजा.
ReplyDeleteअगदी खरय
Deleteमनाला आवर घाला. सुख आणि दुःख दोन्हीही येत जात, कमी जास्त होत राहील.
ReplyDelete😁
DeleteAwesome, thanks for such prosperous thoughts sharing
ReplyDeleteThanks
DeleteNice
ReplyDeleteThank you sir
Delete