मन ...
खरतर याला कसं अन् कुठ बांधून ठेवायचं.
खरतर याला कसं अन् कुठ बांधून ठेवायचं.
प्रत्येक ठिकाणी धाव घेतच ..अल्लड.. उनाड.. अगदी प्रकाशाच्या गतीलाही मागे टाकून!
या मनाचे रंग ते किती !
या मनाचे रंग ते किती !
कधी आश्चर्य, तर कधी निराशा..
कधी जय, तर कधी पराजय ..
स्वप्नांचा डोलारा उभा करणं हा तर मनाचा हक्काचा भाग ... इतकी स्वप्न पाहायची ... अन् पुरी नाही झाली की स्वप्नभंग अन् पूर्ण झाली की नवीन स्वप्न... कारण याला काही कक्षाच नसतात ना.. आणि एवढ्यात समाधान मानेल तर ते मन कसलं! कोणी याला अलगत जपतं, कोणी बेतालपणे, तर कोणी कठोरतेणे.
अस म्हणतात की मनाला शिस्त लावली की आपोआप सगळ सुरळीत चालतं ..पण सगळचं सुरळीत झाल तर आयुष्य ते कसले? आणि मज्जा ती कसली..!! पण काहींही म्हणा, याच अस्तित्व जीवनात बहार निर्माण करते. माझ्या एका दोस्ताचा फेमस डायलॉग आहे, तो नेहमी म्हणतो "गड्याव, जीवनात रंग पाहिजे राव..!" अगदी खर आहे .
माझ्यासाठी मन हे एक फुलपाखरु आहे...त्याला स्वछंद फुलापाखाराप्रमाणे उडून द्यायचे.. भावनांच्या सुमनांवर...कधी या फुलावर कधी त्या फुलावर अलगतच.. नाहू द्यायचं त्याला जीवनाच्या प्रत्येक रंगात... महत्वाचा भाग असा की हे सर्व, फुलाला कोणतीही हानी न पोहोचवता...धक्का न पोहचवता.. मध मात्र गोळा करायचा.. तो पण किती.. जगण्यापुरताच.. वर्तमानापुरताच! इतकं सोप नाही हे, कारण 'फुलपाखराला सुद्धा फुलपाखरू बनण्यासाठी वेगवेगळ्या अवस्थांतून जावे लागते.'
पण ही सहजता आली की जीवनपुष्प रंगमय होऊन आलेल्या प्रत्येक वादळात टवटवीत राहील, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अन् क्षणानंतरही.. इतरांना आपल्या अस्तित्वाच्या सुगंधाने आनंदित करण्यासाठी.
....विश्व ताऱ्यांचे
No comments:
Post a Comment